www.24taas.com झी मीडिया , नवी दिल्ली
पेंग्विन प्रकाशनाची वादग्रस्त पुस्तक `द हिंदूः अॅन ऑल्टरनेटिव हिस्ट्री` या पुस्तकाच्या साऱ्या प्रती बाजारातून काढून नष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.
`द हिंदूः अॅन ऑल्टरनेटिव हिस्ट्री` या पुस्तकावर बंदी आणावी, अशी मागणी हिंदू संघटनांनी २००९ पासून न्यायालयात केली आहे. यासाठी याचिका देखिल दाखल केली होती. यावर न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार पेंग्विन प्रकाशनाने सर्व पुस्तके परत घेऊन नष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.
वँडी डोनिगर या अमेरिकन लेखकाने हे पुस्तक लिहले आहे. शिक्षा बचाओ आंदोलन समिती या संस्थेच्या मते या पुस्तकात हिंदुंच्या विषयी पूर्वग्रहदूषित आणि आकसाने लेखन करण्यात आले आहे.
हे प्रकरण कोर्टाबाहेर चर्चाकरून स्वयंसेवी आणि पेंग्विन प्रकाशन यांनी सांजस्याने हाताळले आहे. सोशल मीडियावर सध्या या पुस्तकाविषयी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.