'सिनेमा'पासून सुरू झाला 'तिच्या' मृत्युचा प्रवास

गँगरेप प्रकरण आणि त्यानंतर तरूणीवर झालेला जीवघेणा हल्ला त्यानंतर तब्बल १३ दिवस तरूणी मृत्युशी झुंज देत होती. मात्र आज या २३ वर्षीय तरूणीने या जगाचा निरोप घेतला.

Updated: Dec 29, 2012, 07:06 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
गँगरेप प्रकरण आणि त्यानंतर तरूणीवर झालेला जीवघेणा हल्ला त्यानंतर तब्बल १३ दिवस तरूणी मृत्युशी झुंज देत होती. मात्र आज या २३ वर्षीय तरूणीने या जगाचा निरोप घेतला. मात्र तिचा हा प्रवास एक सिनेमापासून सुरू झाला होता. आपल्या मित्रासोबत सिनेमा पाहून परतत असताना तिच्यावर हा जीवघेणा प्रसंग गुजरला. दक्षिण दिल्लीतील साकेत भागात सिनेमा पाहण्यासाठी गेलेली तरूणी आणि तिचा मित्र मुनिरका येथे पोहचले. त्यानंतर त्यांनी तेथूनच रस्त्याच्या बाजूला उभी असणारी बस पकडली. ही घटना १६ डिसेंबर रात्रीची आहे.
बसचा चालक आणि त्यात असणारे इतर लोकांनी त्यांना सांगितले की, त्यांना पश्चिम दिल्लीतील द्वारका येथे सोडण्यात येईल. मात्र ही गोष्ट खोटी होती. त्यामुळे बसमध्ये चढताना तरूणी आणि तिच्या मित्राला त्यांच्यावर काही संशय घ्यावा असं वाटलं नाही. आणि हीच त्यांची मोठी चूक ठरली.

ही बस अपराधी प्रवृत्ती असणाऱ्या लोकांच्या हातात होती. आणि त्यात त्या बसचा चालक आणि कंडक्टरही सामिल होते. सकाळी हीच बस मुलांना शाळेत सोडण्याचं काम करीत असे. आणि रात्री या बसचा मालक बस चालक आणि कंडक्टरच्या हवाली करीत असे. मात्र त्याला या लोकांचे इरादे काय आहेत हे माहित नव्हतं.
बसमध्ये चढलेल्या तरूणीला हे माहित नव्हतं की नुकतचं या लोकांनी एका व्यक्तीला लुटून त्याला बाहेर फेकलं होतं, ती व्यक्ती पोलिसांकडेही गेली होती. मात्र पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं.
पोलिसांची मते, जेव्ह बस सुरू झाली तेव्हा सहा जणांनी तरूणीला खेचून मागे नेलं. तिने याला विरोध करताच तिला त्यांनी मारहाण केली. तिच्या मित्राने त्याला विरोध केला. तर त्यांनी त्यालाही जबर मारहाण केली. बसमधील या सहा व्यक्तींनी तिच्यासोबत जवळजवळ ४० मिनिटे दुष्कृत्य केलं, आणि त्यानंतर तिला लोखंडी रॉडनेही मारहाण केली.
त्यानंतर त्यांनी तरूणी आणि तिच्या मित्राला महिपालपूर येथील निर्जन रस्त्यावर फेकून दिले. मात्र तेथून जाणाऱ्या काही लोकांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचीही तसदी घेतली नाही. काहीवेळाने पोलीस आल्यानंतर त्यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेले.

तरूणीला जेव्हा सफदरजंग हॉस्पिटलमध्ये नेलं तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की, अशाप्रकारे कुठल्याही तरूणीला त्यांनी बलात्कार झालेल्या अवस्थेत पाहिलं नव्हतं. इतकी वाईट अवस्था त्या तरूणीची या नराधमांनी केली होती.
जीवन आणि मरण यांच्या संघर्षात पीडित तरूणीला उपचारांसाठी बुधवारी सिंगापूरमध्ये पाठविण्यात आलं होतं. मात्र शनिवारी पहाटे तिची प्रकृती पूर्णपणे ढासळली. आणि तिची प्राणज्योत मालवली.