नवी दिल्ली : मोदी सरकारनं तिस्ता सेटलवाड यांना चांगलाच दणका दिलाय.
तिस्ता सेटलवाड यांची स्वयंसेवी संस्था अर्थात एनजीओ 'सबरंग' या संस्थेला परदेशातून येणारा निधी थांबवण्यात आलाय.
फसवणूकीच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आलीय. 'सबरंग'चा परवानाच गृह मंत्रालयानं रद्द केलाय.
परदेशी निधी नियमन कायदा म्हणजेच FCRA च्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आलीय.
गुजरातच्या दंगलग्रस्तांसाठी फोर्ड फाऊंडेशनकडून मिळालेल्या निधीचा गैरवापर केल्याचा ठपका तिस्ता सेटलवाड यांच्यावर ठेवण्यात आलाय.