मुजफ्फरनगर : उत्तर प्रदेशातील मुजफ्फरपूर येथील एका सरकारी शाळेमधील शिक्षकाने विद्यार्थींनींना अश्लील व्हिडिओ दाखविण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
विद्यार्थींनींनी तक्रार केल्यानंतर शिक्षकाविरूद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बुड्ढाखेडा गावातील प्राथमिक शाळेत शिकविणारा शिक्षामित्र राजकुमार याच्यावर आरोप लावण्यात आला आहे की, त्याने मधल्या सुट्टीत मुलांना आपल्या फोनवर अश्लिल फिल्म दाखवली. त्यानंतर यातील काही विद्यार्थ्यांनी घरी गेल्यावर आपल्या पालकांना याची माहिती दिली.
दरम्यान, या शिक्षकाला हटविण्याची मागणी होत आहे.