तुमच्या आवडत्या क्रमांकाला बनवा तुमचा मोबाईल क्रमांक!

 टाटा टेलिसर्व्हसेसच्या एकीकृत दूरसंचार ब्रांड असलेल्या टाटा डोकोमोनं एक नवीन सेवा सुरु केलीय. या नवीन सेवेद्वारे ग्राहकांना आपला मोबाईल नंबर स्वत:च बनवता येणार आहे.

Updated: Dec 23, 2014, 11:43 AM IST
तुमच्या आवडत्या क्रमांकाला बनवा तुमचा मोबाईल क्रमांक! title=

नवी दिल्ली :  टाटा टेलिसर्व्हसेसच्या एकीकृत दूरसंचार ब्रांड असलेल्या टाटा डोकोमोनं एक नवीन सेवा सुरु केलीय. या नवीन सेवेद्वारे ग्राहकांना आपला मोबाईल नंबर स्वत:च बनवता येणार आहे.

कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांना कोणत्याही टाटा डोकोमो ब्रांड स्टोअर्समध्ये जाऊन आपल्या पसंतीचा नंबर बनविता येणार आहे. हा नंबत त्यांचा जन्मदिवस किंवा इतर कोणत्याही आवडत्या नंबरवरून ते ठरवू शकतात.

आपला नंबर सहजसोपा असावा अशी इच्छा असणाऱ्या ग्राहकांना या सुविधेचा निश्चितच लाभ होणार आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.