अटक टळली, गोवा पोलिसांची तेजपाल यांना मदत - आभा सिंग

गोवा पोलिसांनी दिल्लीमध्ये तरुण तेजपालांच्या निवासस्थानी छापा टाकला मात्र ते कुठेही आढळून आले नाहीत.त्यामुळे तेजपाल कुठे लपलेत, असा प्रश्न निर्माण होतोय. गोवा पोलीसच तेजपाल यांना मदत करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या आणि वकील आभा सिंह यांनी म्हटलंय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 29, 2013, 12:02 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पणजी
गोवा पोलिसांनी दिल्लीमध्ये तरुण तेजपालांच्या निवासस्थानी छापा टाकला मात्र ते कुठेही आढळून आले नाहीत.त्यामुळे तेजपाल कुठे लपलेत, असा प्रश्न निर्माण होतोय. गोवा पोलीसच तेजपाल यांना मदत करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या आणि वकील आभा सिंह यांनी म्हटलंय.
दरम्यान, लैंगिक शोषणाचा आरोप असलेले तरुण तेजपाल यांची अटक टाळण्यासाठी धडपड सुरुच आहे. पणजीच्या सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. तेजपालांच्या वकीलांनी ही याचिका दाखल केलीये. दुपारी अडीच वाजता त्यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी होणार आहे.
तरुण तेजपाल लैंगिक शोषण प्रकरणी गृहमंत्रालय गोवा पोलिसांकडून रिपोर्ट मागितलाय. तसंच देशात कुठल्याही महिलेवरील अन्यायाविरोधात कडक पावलं उचलली जातील असं वक्तव्य गृहराज्यमंत्री आर.पी.एन.सिंग यांनी म्हटलंय. ते दिल्लीत बोलत होते. तसंच या मुद्याला राजकीय वळण देण्याची गरज नसल्याचं सांगत त्यांनी भाजपला सुनावलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.