जयललिता तुरूंगात, १६ चाहत्यांची आत्महत्या

बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना विशेष न्यायालयाने चार वर्षांची शिक्षा सुनावली, यानंतर राज्यातील त्यांच्या 16 चाहत्यांनी आत्महत्या केली असल्याचं सांगण्यात येत आहे.

Updated: Sep 29, 2014, 06:10 PM IST
जयललिता तुरूंगात,  १६ चाहत्यांची आत्महत्या title=

चेन्नई : बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना विशेष न्यायालयाने चार वर्षांची शिक्षा सुनावली, यानंतर राज्यातील त्यांच्या 16 चाहत्यांनी आत्महत्या केली असल्याचं सांगण्यात येत आहे.

याविषयी बोलतांना पोलिसांनी सांगितलंय, ‘जयललिता यांना शिक्षा झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. राज्यभरातील अनेक चाहत्यांनी थेट आत्महत्येचा मार्ग स्वीकारला आहे. आत्महत्या करणाऱयांमध्ये विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. 

तीन जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. एकाने बससमोर उडी मारून आत्महत्या केली. काही नागरिकांनी विष प्राशन करून व हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने मृत्यू झाला आहे. बारावीमध्ये शिकत असलेल्या दोन विद्यार्थ्यांनी जाळून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासह काही जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अनेकांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यात आले आहे.‘ 

पक्षातील नेत्यांनी सांगितले की, जयललिता यांना शिक्षा झाल्यामुळे अनेकांना मोठा धक्का बसला आहे. जयललितांची लोकप्रियता मोठी असून, अनेकजण शेवटचा मार्ग पत्करत आहेत. परंतु, चाहत्यांनी हे पाऊल उचलू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. 

तमिळनाडूमध्ये ठिकठिकाणी निदर्शने सुरू असून, अनेक दुकाने बंद आहेत. विविध कंपन्यांनी सुटी जाहीर करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.