LIVE UPDATE | गुरूदासपूर चकमक संपली, गृहमंत्रालयाची बैठक सुरू

पंजाबच्या गुरूदासपूरमध्ये संशयित दहशतवादी हल्ला झाला आहे, चार संशयित दहशतवाद्यांनी गुरूदासपूरहून जम्मू-काश्मीरला जाणाऱ्या बसवर गोळीबार केला आहे. 

Updated: Jul 27, 2015, 06:54 PM IST
LIVE UPDATE | गुरूदासपूर चकमक संपली, गृहमंत्रालयाची बैठक सुरू title=

गुरूदासपूर : UPDATE 06.44 PM - पंजाबचे डीजीपी सुमेद सिंग सैनी यांनी सांगितले की, दहशतवाद्यांकडे चिनी बनावटीचे हत्यार सापडले आहे. 

- डीजीपीने सांगितले की, सर्व तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलण्यात आले आहेत. 

- दहशतवाद्यांकडे जीपीएस सिस्टिम होती त्यामुळे त्यांच्या ठिकाणांचा पत्ता काढणे शक्य होते. 

- पंजाब हल्ल्याबाबत गृहमंत्रालयाची बैठक सुरू , बैठकीत गृहमंत्री राजनाथ सिंग, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि एनएसए अजित डोभाल उपस्थित आहेत. 

गुरूदासपूरची दहशतवाद्यांशी चकमक बारातासानंतर संपली, चकमक संपल्याची अधिकृत घोषणा मात्र बाकी, तीन दहशतवाद्यांना ठार मारण्यात यश, चकमकीत ५ पोलिस शहीद, यात एका एसपीचाही समावेश, तीन नागरिकही मृत्युमुखी UPDATE 05.00 PM

ऑपरेशन संपल्यावर जल्लोष करताना पंजाब स्वार्ट टीमचे पोलीस

 

पंजाबमधील दहशतवादी हल्ल्यावर राजनाथ सिंह संसदेत उद्या निवेदन करणार  03.10

चार पैकी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 02.00 PM

हल्ल्यात एक महिला दहशतवादी सहभागी असल्याची प्राथमिक माहिती, दहशतवाद्यांनी घातले होते मिलिट्रीच्या जवानांचे कपडे 01.30 PM

जवानांनी एका दहशतवाद्याचा मुडदा पाडला 01.26 PM

जम्मूच्या हिरानगर सेक्टरमधून दहशतवादी आल्याची माहिती 01.20 PM

गुरूदासपूर हल्ल्यात एसपी बलजित सिंह शहीद 01.02 PM

सीमा सुरक्षा हा केंद्राच्या अखत्यारितला विषय, हा राज्याचा नाही, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा केंद्रावर निशाणा 01.00 PM

गुरूदासपूर हल्ल्यावरून संसदेत गदारोळ, गृहमंत्री लवकरच निवेदन देतील, व्यैकय्या नायडू यांची माहिती 12.27 PM

 एका दहशतवाद्याला कंठस्नान  10.21 AM

इंडियन आर्मी, एनएसजी, एसएसजी, पंजाब पोलिसांकडून संयुक्त ऑपरेशन जारी, हल्ल्याला सक्षम उत्तर देण्यास तयार 10.03 AM

हॉस्पिटलमधील हल्ल्यात २ रूग्ण ठार. UPDATE 09.35 AM
दिनानगर पोलिसस्टेशन हल्ल्यात ३ पोलिस शहीद, ४ नागरिकांचा मृत्यू 
बीएसएफची एक तुकडी गुरूदासपूरला पोहोचली
पाक सीमेला लागून पहाडपूर सीमेवरून दहशतवाद्यांनी घुसघोरी केल्याचा संशय 
लष्कर-ए-तैय्यबाच्या बडाभाई मकसूद हल्ल्याचा मास्टर माईंड असल्याचा संशय
एनएसजीची एक टीम गुरूदासपूरला रवाना 
गुरूदासपूरमध्ये हॉस्पिटलवरही गोळीबार, पोलिसांची घेराबंदी
हेलिकॉप्टरकडून दहशतवाद्यांची शोधाशोध 
पंजाब हल्ला | दहशतवाद्यांचा अजूनही पोलिस ठाण्यावर दबा 

हेलिकॉप्टरकडून दहशतवाद्यांची शोधाशोध, नेमके किती दहशतवादी आहेत याचा शोध सुरू  09.25 AM

पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या पहाडपूर सीमेवरून दहशतवाद्यांनी घुसघोरी केल्याचा संशय आहे, लष्कर-ए-तैय्यबाच्या बडाभाई मकसूद हा या हल्ल्यामागे मास्टरमाईंड असल्याचं सांगण्यात येत आहे. 09.22 AM

'एनएसजी'ची टीम गरूदासपूरला रवाना, लष्कर ए तैय्यब्बाचा हा हल्ला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. २५ तारखेला रात्री सीमेतून काही दहशतवाद्यांनी घुसघोरी केल्याचं सांगण्यात येत आहे. 09.20 AM

बीएसएफच्या जवानांची तुकडी गुरूदासपूरला पाठवली, दहशतवाद्यांची नेमकी संख्या किती आहे, याची अजून अंदाज लागलेला नाही. 09.16 AM

पंजाब राज्यात २५ वर्षानंतर मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे, यात एका पोलिस शहीद झाला आहे. इंडियन आर्मी आणि पंजाब पोलिस यांनी संयुक्तरित्या दहशतवाद्यांना उत्तर देणं सुरूच ठेवलं आहे. 09.15 AM

पोलिसांकडून हॉस्पिटलला घेराबंदी करण्यात आली आहे, कारण हॉस्पिटलमध्येही दहशतवादी लपले असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिस स्टेशनवरमध्येही दहशतवादी दबा धरून बसले आहेत. 09.11 AM

पंजाबच्या गुरुदासपूर शहरात दहशतवाद्यांनी पोलिस स्टेशनवर हल्ला करून, पोलिस ठाणे ताब्यात घेतले आहे. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात एक पोलिस शहीद तर चार जखमी झाले आहेत, या दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी, पठाणकोटवरुन लष्कराच्या एका तुकडीलाही पाचारण करण्यात आलं आहे.

पंजाबहून जम्मूकडे जाणाऱ्या बसवर गोळीबार

दहशतवाद्यांनी सुरुवातीला पंजाबहून जम्मूकडे जाणाऱ्या बसवर गोळीबार केला. यात बसमधील  ४ प्रवासी जखमी झाले. ज्यांनी ही घटना पाहिली, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ३ दहशतवादी लष्कराच्या वेशात मारुती कारनं आले, यानंतर त्यांनी जम्मूला पंजाबशी जोडणाऱ्या महामार्गावर एकाएकी गोळीबार सुरु केला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.