`युवराज-विकी डोनर`ची वार्षिक कमाई ४० लाख

हरियाणाचा एक शेतकरी आपल्या रेड्याचं वीर्य विकून ४० लाख रूपयांची वार्षिक कमाई करतो. हा रेडा म्हशींमधील मुर्राह प्रकारातला आहे.

Updated: Feb 18, 2014, 12:11 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, हरियाणा
हरियाणाचा एक शेतकरी आपल्या रेड्याचं वीर्य विकून ४० लाख रूपयांची वार्षिक कमाई करतो. हा रेडा म्हशींमधील मुर्राह प्रकारातला आहे.
कुरूक्षेत्रचे रहिवासी असलेले करमवीर सिंह यांचा हा रेडा `युवराज` त्यांच्यासाठी संपत्तीचा झरा ठरला आहे. कारण त्यांच्या `युवराज`च्या वीर्याला उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
करमवीर सिंहने दिलेल्या माहितीनुसार, वीर्य विकून दरवर्षी आपली ४० लाख रूपयांची कमाई होते. कारण आमच्या साडेपाच वर्षाच्या रेड्याचं वीर्य पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश आणि राजस्थानसह अनेक राज्यात मागितलं जातं.
युवराजला त्यांनी चप्परचिरीमध्ये पंजाब कृषी मेळाव्यात खरेदी केलं होतं. आम्ही वीर्याचा प्रत्येक डोस ३०० रूपयांच्या भावाने विकतो. दरवर्षी आमच्या युवराजचे १५ हजारपासून २० हजारापर्यंत डोस विकले जातात.
पंजाब राज्य शेतकरी आयोगचे डेअरी तज्ञ अनिल कौरा यांनीही युवराजचं वीर्य खरेदीला प्राधान्य दिलं आहे.
कारण कारण यानंतर म्हशी सरासरी ४ हजार लीटर दूध देतात. तर मिश्रित जातीची म्हैस २ हजार ते २२०० लीटर दूध देते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.