स्टेट बॅंक, आयसीआयसीआय बॅंकेने गृह कर्ज दर घटवले

भारतीय स्टेट बॅंक (SBI) आणि आयसीआयसीआय बॅंक (ICICI) या दोन बॅंकांनी आपल्या ग्राहकांसाठी चांगली बातमी दिली आहे. होम लोनमध्ये कपात केलेय. महिलांसाठी विशेष सवलत जारी केलेय. त्यामुळे आता सामान्यांना घर घेणे शक्य होणार आहे.

Updated: Apr 8, 2016, 10:55 AM IST
स्टेट बॅंक, आयसीआयसीआय बॅंकेने गृह कर्ज दर घटवले title=

मुंबई : भारतीय स्टेट बॅंक (SBI) आणि आयसीआयसीआय बॅंक (ICICI) या दोन बॅंकांनी आपल्या ग्राहकांसाठी चांगली बातमी दिली आहे. होम लोनमध्ये कपात केलेय. महिलांसाठी विशेष सवलत जारी केलेय. त्यामुळे आता सामान्यांना घर घेणे शक्य होणार आहे.

स्टेट बॅंकेने आपल्या गृहकर्जात मोठी कपात केलेय. आता ९.४५ टक्के तर महिलांसाठी हाच व्याज दर ९.४ टक्के आहे. रिझर्व्ह बॅंकेने ०.२५ टक्के रेपो दरात कपात केली होती. त्यामुळे बॅंकांनीही कर्ज दरात कपात करण्याचा निर्णय घेतला. ही कर्ज कपात एप्रिलपासून लागू होणार आहे. याआधी स्टेट बॅंकेत होम लोन ९.५५ टक्के होते. तर महिलांसाठी ९.५ टक्के होते.

स्टेट बॅंकेनंतर आयसीआयसीआय बॅंकेनेही कर्ज दरात कपात केलेय. गृह कर्जावर ०.१० टक्के कपात केली असून ९.४ टक्के व्याज दर केलाय. तर महिला खरीदीदारांसाठी फ्लोटिंग दर लागू केलाय. ५ कोटी रुपये पेक्षा जास्त कर्ज घेणाऱ्यांसाठी ९.६५ टक्के तर २५ लाख रुपयांपर्यंत गृह कर्ज घेणाऱ्यांसाठी ९.४० टक्के दर असणार आहे.