नवी दिल्ली : आजीवन बंदी घालण्यात आलेला क्रिकेटर एस. श्रीसंत आता भाजपमध्ये सामील झालाय. आगामी केरळ विधानसभा निवडणुकांत तिरुनंतपुरममधून तो निवडणूक लढणार असल्याचं आता निश्चित झालंय.
शुक्रवारी, भाजपनं केरळ विधानसभा निवडणुकांसाठी ५४ उमेद्वारांच्या नावांची घोषणा केली. यामध्ये, श्रीसंतच्या नावाचाही समावेश आहे. केरळच्या निवडणुका १६ मे रोजी होणार आहेत.
S Sreesanth to contest from Thiruvananthapuram on BJP ticket in Kerala assembly elections pic.twitter.com/96eueHrP0q
— ANI (@ANI_news) 25 March 2016
श्रीसंतवर आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंगचा आरोप लावण्यात आला होता. यानंतर बीसीसीआयनं त्याच्यावर आजीवन बंदीचा आदेश दिलाय. परंतु, दिल्लीच्या एका न्यायालयानं मात्र त्याला सगळ्या आरोपांमधून मुक्त केलंय.
यापूर्वी, २००८ साली श्रीसंत हरभजन सिंहकडून एक कानाखाली खाल्ल्यामुळेही चर्चेत होता. तसंच डान्स रिअॅलिटी शो 'झलक दिखला जा'मध्येही तो सहभागी झाला होता.