मुकेश अंबानी पुन्हा बनले भारतातील सर्वात धनाढ्य व्यक्ती

 उद्योगपती मुकेश अंबानी यांनी पुन्हा एकदा जगातील सर्वात धनाढ्य भारतीय म्हणून आपली ओळख कायम ठेवली आहे. अंबानी १९.६ अब्जाच्या संपत्तीसह पहिल्या स्थानावर आहेत. 

Updated: Apr 27, 2015, 08:37 PM IST
मुकेश अंबानी पुन्हा बनले भारतातील सर्वात धनाढ्य व्यक्ती title=

न्यूयॉर्क :  उद्योगपती मुकेश अंबानी यांनी पुन्हा एकदा जगातील सर्वात धनाढ्य भारतीय म्हणून आपली ओळख कायम ठेवली आहे. अंबानी १९.६ अब्जाच्या संपत्तीसह पहिल्या स्थानावर आहेत. 

औषध क्षेत्रात दिग्गज असलेल्या दिलीप सांघवी सात आठवडे पहिल्या क्रमांकावर राहिल्यानंतर दुसऱ्या स्थानावर आले आहे. शेअर बाजार कोसळल्यानंतर सांघवीच्या नेतृत्त्वाखालील सन फार्मा या कंपनीचे शेअर २ टक्क्याने कमी झाले आहेत. तर रिलायन्स इंडस्ट्रिजच्या शेअरमध्ये केवळ ०.५५ टक्क्याची घट झाली. 

यामुळे सांघवी यांचे एकूण संपत्तीत ४५ कोटी डॉलर्सची कमतरता आली. फोर्ब्सच्या धनाढ्य व्यक्तींच्या यादीतील ही तिसरी सर्वात मोठी घसरण आहे.फोर्सच्या नवी यादीनुसार सांघवी यांची एकूण संपत्ती १९.३ अब्ज डॉलर आहे. जागतील धनकुबेरांच्या यादीत मुकेश अंबानी ४६ व्या स्थानावर आहेत. तर सांघवी ४८ स्थानावर आहेत. टॉप ५० मध्ये केवळ दोघा भारतीयांना स्थान मिळाले आहे. 

दोन मार्चला जारी करण्यात आलेल्या फोर्ब्सच्या यादीत अंबानी ३९ व्या स्थानावर होते. तर सांघवी ४४ व्या स्थानावर होते. पण दोन दिवसांनंतर चार मार्च रोजी सांघवी यांनी अंबानींना मागे टाकत पहिल्या स्थानावर धडक दिली होती. 

सध्याच्या यादीनुसार अंबानी आणि संघवीनंतर अझीम प्रेमजी, लक्ष्मी मित्तल, शिव नडार, कुमार मंगलम बिर्ला, उद्य कोटक, सुनीलम मित्तल, सायरस पूनावाल आणि गौतम अदाणी १० धनाढ्यांच्या यादीत आहेत. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.