स्पॅनिश ट्रेन मुंबई-दिल्ली प्रवास ५ तासांनी करणार कमी

 देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई आणि राजधानी दिल्ली यांच्यातील रेल्वे रूळ खूप जुने असले तरी येत्या ऑक्टोबरपासून या ट्रॅकवर स्पेनची एक ट्रेन धावू शकते. मोदी सरकारने स्पेनच्या लोकोमोटिव्ह मेकर ताल्गो कंपनीने हलकी आणि जलद गतीच्या ट्रेनच्या ट्रायल रनला सैद्धांतिक मंजुरी दिली आहे. या ट्रेनद्वारे जुन्या रेल्वे रुळांना न बदलता प्रवासाचा कालावधी ४० टक्क्यांनी कमी होऊ शकतो. 

Updated: Jul 24, 2015, 05:35 PM IST
स्पॅनिश ट्रेन मुंबई-दिल्ली प्रवास ५ तासांनी करणार कमी title=

मुंबई :  देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई आणि राजधानी दिल्ली यांच्यातील रेल्वे रूळ खूप जुने असले तरी येत्या ऑक्टोबरपासून या ट्रॅकवर स्पेनची एक ट्रेन धावू शकते. मोदी सरकारने स्पेनच्या लोकोमोटिव्ह मेकर ताल्गो कंपनीने हलकी आणि जलद गतीच्या ट्रेनच्या ट्रायल रनला सैद्धांतिक मंजुरी दिली आहे. या ट्रेनद्वारे जुन्या रेल्वे रुळांना न बदलता प्रवासाचा कालावधी ४० टक्क्यांनी कमी होऊ शकतो. 

ताल्गोचे सीईओ जोस ओरियोल यांनी गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत ओरियोल यांनी सांगितले की, ऑक्टोबर आणि नोव्हेबरच्या सुरूवातीला ट्रायल ट्रेन भारतात आणणार आहोत. ही ट्रेन कंपनी आपल्या खर्चाने आणि जोखमीवर भारतात आणणार आहे. या ट्रेनचा उद्देश सध्या मुंबई-दिल्ली प्रवास १७ तासावरून १२ तास करणे हा आहे. या ट्रेनचा स्पीड १६० ते २२० किलोमीटर असणार आहे. ट्रेनला भारतात आणण्यासाठी औपचारीक मंजुरीची वाट पाहत असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.