'पाक जिंदाबाद, मोदी मुर्दाबाद'च्या सपा नेत्याच्या घोषणा

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरात समाजवादी पक्षाच्या एका नेत्याविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला आहे. महमूद आलम असे या नेत्याचे नाव आहे. 'पाकिस्तान जिंदाबाद, नरेंद्र मोदी मुर्दाबाद' अशा घोषणा देण्याचा तसेच जनतेला चिथवण्याचा आरोप आलम याच्यावर ठेवण्यात आले आहे.

Updated: Jun 30, 2014, 07:44 PM IST
'पाक जिंदाबाद, मोदी मुर्दाबाद'च्या सपा नेत्याच्या घोषणा title=

मुझफ्फरनगर : उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरात समाजवादी पक्षाच्या एका नेत्याविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला आहे. महमूद आलम असे या नेत्याचे नाव आहे. 'पाकिस्तान जिंदाबाद, नरेंद्र मोदी मुर्दाबाद' अशा घोषणा देण्याचा तसेच जनतेला चिथवण्याचा आरोप आलम याच्यावर ठेवण्यात आले आहे.

महमूद आलम हा झिंझाना येथील रहिवासी आहे. आलम हा मेरठ-करनाल महामार्गावर गाड्या थांबवून चालकांकडून बेकायदा वसुली करत होता. पोलिसांनी त्याला रंगेहाथ अटक केली. परंतु, आलमने पोलिसांशी गैरवर्तवणूक केली. आलमने मद्यपान केले होते. पोलिसांनी अखेर त्याच्या नांग्या आवळून त्याला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिस त्याला पोलिस ठाण्यात नेले जात असताना त्याने 'पाकिस्तान जिंदाबाद, नरेंद्र मोदी मुर्दाबाद' अशी घोषणाबाजी केली. पोलिसांनी आरोपी आलमच्या विरोधात शांतता भंग करणे केल्याचा आरोप केला. परंतु, वरीष्ठ अधिकार्यांपना सत्य माहिती कळाल्यानंतर आलमविरोधात देशद्रोहाचा खटला भरण्यात आला आहे.  आरोपी महमूद आलाम याला कोर्टात उभे केले जाणार असल्याचे एसएचओ बी.पी.यादव यांनी सांगितले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.