राम जन्मभूमी अयोध्येला का मानतात दक्षिण कोरिया लोक, जाणून घ्या?

उत्तर प्रदेश येथील भगवान राम जन्मभूमी अयोध्या शहराचे दक्षिण कोरियाशी जवळपास २००० वर्षांपासून जुने संबंध आहेत. दक्षिण कोरियन लोक अयोध्येला आपल्या महाराणीची मातृभूमी मानतात. आजही आपल्या दिवंगत राणीला श्रद्धांजली वाहण्यासाठी शेकडो कोरियन लोक अयोध्येत येतात.

Updated: Mar 5, 2016, 09:12 AM IST
राम जन्मभूमी अयोध्येला का मानतात दक्षिण कोरिया लोक, जाणून घ्या? title=

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश येथील भगवान राम जन्मभूमी अयोध्या शहराचे दक्षिण कोरियाशी जवळपास २००० वर्षांपासून जुने संबंध आहेत. दक्षिण कोरियन लोक अयोध्येला आपल्या महाराणीची मातृभूमी मानतात. आजही आपल्या दिवंगत राणीला श्रद्धांजली वाहण्यासाठी शेकडो कोरियन लोक अयोध्येत येतात.

सोमवारी एका दक्षिण कोरियन प्रतिनिधी मंडळाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याशी चर्चा केली. महाराणी सुरिरत्ना हुर ह्वांग ओके यांचे स्मारक बांधण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. महाराणीला प्रिन्सेस सुरिरत्ना या नावाने ओळखले जाते. ऐतिहासिक दाव्यानुसार प्रिन्सेस सुरिरत्ना मूळची अयोध्येतील राहणारी होती. ४८ व्या शतकात करक क्लानचा राजा किम सुरो यांच्याशी तिचे लग्न झाल्यानंतर ती कोरियाला गेली.

कोरियन आर्किटेक्चरप्रमाणे होणार स्मारक

दरम्यान, दक्षिण कोरिया दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले होते. त्यावेळी मोदी यांनी अयोध्या संबंधात आठवण केली होती. यावेळी अयोध्यत महाराणी सुरिरत्ना यांचे मोठे स्मारक उभारण्याबाबत चर्चा झाली होती. तसेच मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी दक्षिण कोरियन शिष्टमंडळाला सांगितले, हे स्मारक कोरियन आर्किटेक्चरप्रमाणे होईल.