नवी दिल्ली : रेल्वेचे ऑनलाईन आरक्षण करण्यासाठी लवकरच आधार क्रमांक बंधनकारक होऊ शकतो. तिकिटांचं बल्क बुकिंग आणि दलाली टाळण्यासाठी रेल्वे मंत्रालयानं हा निर्णय घेतला आहे.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज रेल्वेच्या 2017-2018च्या बिझनेस प्लॅनचं अनावरण केले. रेल्वेची बुकिंग कॅशलेस यंत्रणेकडे वळवण्यावर यात भर देण्यात आला आहे.
1 एप्रिलपासून प्रायोगिक तत्ताववर 3 महिन्यांसाठी ज्येष्ठ नागरिकांच्या बुकिंगसाठी आधार क्रमांक सक्तीचा करण्यात आलाय. आगामी काळात सर्वच प्रकारच्या आरक्षणांना आधार बंधनकारक केला जाऊ शकतो.