सोनियांचे जावई संतापले, रिपोर्टरचा माईक ढकलला!

जमिनीच्या व्यवहारांबाबत विचारल्या सोनिया गांधींचे जावई आणि बिझनेसमन रॉबर्ट वड्रा संतापले. संतापाच्या भरात त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेच्या रिपोर्टरचा माईक ढकलला. तसंचवड्रांच्या सुरक्षा रक्षकांनी पत्रकाराला फुटेज डिलीट करण्याची धमकी दिली. या घटनेवरून वड्रांसह काँग्रेसवरही सडकून टीका होतेय. तर काँग्रेसनं वड्रांची पाठराखण केली आहे.

ANI | Updated: Nov 2, 2014, 02:04 PM IST
सोनियांचे जावई संतापले, रिपोर्टरचा माईक ढकलला! title=

नवी दिल्ली: जमिनीच्या व्यवहारांबाबत विचारल्या सोनिया गांधींचे जावई आणि बिझनेसमन रॉबर्ट वड्रा संतापले. संतापाच्या भरात त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेच्या रिपोर्टरचा माईक ढकलला. तसंचवड्रांच्या सुरक्षा रक्षकांनी पत्रकाराला फुटेज डिलीट करण्याची धमकी दिली. या घटनेवरून वड्रांसह काँग्रेसवरही सडकून टीका होतेय. तर काँग्रेसनं वड्रांची पाठराखण केली आहे.

दिल्लीतल्या फाईव्ह स्टार अशोकामध्ये हॉटेलमध्ये जिमच्या एका कार्यक्रमासाठी रॉबर्ट वड्रा आले होते. तिथं आलेल्या एएनआय न्यूज एजन्सीच्या रिपोर्टरनं त्यांना सुरूवातीला जिमबद्दल प्रश्न केला आणि वड्रांनी त्याला सहजतेनं उत्तर दिलं. 
यानंतर रिपोर्टरनं त्यांना हरियाणातील जमीन घोटाळाप्रकरणी प्रश्न करताच वड्रा एकदम भडकले. 'आर यू सीरियस, आर यू सीरियस, आर यू सीरियस' असं म्हणत वड्रांनी रिपोर्टरचा माइक झटकला आणि 'कॅमेरा बंद कर' असं दरडावलं. 'तू मूर्ख आहेस का? काय अडचण आहे तुझी? या प्रश्नाच्या उत्तरासाठी तू योग्य नाहीस', असं वड्रा धमकावून बोलले. इतकंच नाही तर वड्रांनी बॉडीगार्ड्सना सांगतिलं की 'हे सर्व फुटेज लगेच डिलीट करा'.

डीएलएफ जमीन घोटाळाप्रकरणी चौकशी करणार असल्याचं हरियाणात सत्तेत आलेल्या भाजप सरकारनं सांगितल्यानं रॉबर्ट वड्रांवर चौकशीची टांगती तलवार आहे. हरियाणा सरकारच्या निर्णयावरून जमीन घोटाळाप्रकरणी रिपोर्टरनं वड्रांना प्रश्न केला होता. त्यावरून ते भडकले. या घटनेनंतर वड्रा यांच्या ऑफिसने एक पत्रक जाहीर केलं. 'हॉटेलमधला कार्यक्रम खासगी होता आणि तिथं मीडिया नसेल असं वढेरांना वाटलं. तिथं आलेला खासगी फोटोग्राफर त्यांना असा का प्रश्न करतोय, तो एएनआयचा रिपोर्टर आहे हे वड्रांना माहीत नव्हतं', असं त्या पत्रकात नमूद केलं आहे. 

टीव्ही रिपोर्टरला केलेल्या धक्काबुक्की प्रकरणानं वड्रा वादात अडकलेत. वड्रांनी याप्रकरणी बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी एडिटर्स असोसिएशननं केली आहे. तर 'आपल्या सासूबाई सत्तेत नाहीत, हे रॉबर्टवड्रांनी लक्षात घ्यावं... वड्रांना नव्हे, तर इतरांनाच त्यांच्यापासून संरक्षणाची गरज आहे', अशी बोचरी टीका भाजप नेते सुब्रमण्यम स्वामींनी केलीय.
 
'वड्रांना उत्तर द्याचं नव्हतं तर त्यांनी नो कमेंट्स म्हणत विषय संपवला असता. पण रिपोर्टरशी अशी वर्तवणूक करणं योग्य नाही', असं राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी सांगितलं. 'हीवड्रांची मुजोरी आहे. फुटेज डिलीट करण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला?, असा सवाल शाझिया इल्मी यांनी केलाय

पाहा व्हिडिओ - 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.