सोनिया गांधी यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज

 कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. सोनिया गांधी यांना ११  दिवसांच्या  उपचारांनंतर डिस्चार्ज मिळाला. सोनिया यांच्या दिल्लीमधील गंगा राम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. सोनियांना आज घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. 

Updated: Aug 14, 2016, 10:37 PM IST
सोनिया गांधी यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज title=

नवी दिल्ली :  कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. सोनिया गांधी यांना ११  दिवसांच्या  उपचारांनंतर डिस्चार्ज मिळाला. सोनिया यांच्या दिल्लीमधील गंगा राम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. सोनियांना आज घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. 

सोनिया यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचे निदर्शनास आले आहे, आता त्यांना तापही नाही, अशी माहिती या हॉस्पिटलटटे अध्यक्ष डी एस राणा यांनी दिली आहे. 

वाराणसी येथे गेल्या २ ऑगस्ट रोजी सोनिया यांचा मोठा 'रोड शो' आयोजित करण्यात होता. मात्र यादरम्यान अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना वाराणसी दौरा अर्धवट सोडावा लागला होता. 

सोनिया गांधी दुसऱ्या दिवशी त्यांना ताप, अशक्तपणा आणि खांद्याच्या दुखापतीच्या पार्श्‍वभूमीवर तातडीने दिल्लीमधील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर सोनिया यांच्या डाव्या खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.