नवी दिल्ली : जामा मशिदीचे शाही इमाम यांचा मुलगा शाबान बुखारी याने एका हिंदू तरूणीशी विवाह केल्याचे वृत्त समोर आले आहे. दोघे गेल्या दोन वर्षांपासून एकत्र होते.
दरम्यान, दावत-ए-वलिमा (रिेसेप्शन) १४ नोव्हेंबरला महिपालपूर येथे एका फार्म हाऊसमध्ये होणार आहे. या रिसेप्शनचे निमंत्रण ज्या लोकांना पाठविली त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांचाही समावेश असल्याचेही माहिती सूत्रांकडून मिळते आहे.
"दैनिक जागरण"मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार सैयद अहमद बुखारी यांचा मुलगा शाबान याने उत्तर प्रदेशातील गाझियाबादची राहणाऱ्या एका हिंदू मुलीशी विवाह केला आहे. सूत्रांनुसार हा निकाह मित्र आणि काही जवळच्या मंडळींच्या उपस्थितीत पार पडला. जामा मशिद परिसरात हा निकाह झाला.
या लग्नाला सुरूवातीला बुखारी विरोधात होते. पण मुलीने इस्लाम कबूल केल्यानंतर त्यांनी या लग्नाला मंजुरी दिली. मिळालेल्या माहितीनुसार मुलगी गेल्या काही दिवसांपासून कुराणाचे पठण करत होती.
विशेष म्हणजे गेल्या वर्षी २२ नोव्हेंबरला शाबान याला जामा मशिदीचा नायब इमाम घोषित करण्यात आले आहे. पुढील इमाम तोच होणार आहे. २० वर्षीय शाबान एमिटी युनिवर्सिटीच्या सोशल वर्कमध्ये ग्रॅज्युएशन केले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.