सोशल मीडियाचा प्रभाव वाढतोय- प्रणव मुखर्जी

सोशल मीडियाचा प्रभाव गेल्या काही वर्षात कमालीचा वाढलाय , असं मत व्यक्त केलंय आपले राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी. 

Updated: Mar 21, 2017, 04:49 PM IST
सोशल मीडियाचा प्रभाव वाढतोय- प्रणव मुखर्जी  title=

नवी दिल्ली : सोशल मीडियाचा प्रभाव गेल्या काही वर्षात कमालीचा वाढलाय , असं मत व्यक्त केलंय आपले राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी...

ते म्हणाले तंत्रज्ञानाचा वापर वाढल्याने माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला आहे. त्यामुळे तंत्रज्ञानासोबत माध्यमेही जास्त प्रभावी ठरत आहेत. 

एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, 'प्रिंट पत्रकारिता मात्र आपली वेगळी जागा राखून आहे. कारण त्यात वर्षानुवर्षे लिहून येणारे कॉलम्स वाचकांमध्ये आपली आवड कायम ठेऊन आहेत.'

राजस्थान पत्रिका आयोजित पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात ते म्हणाले, 'वृत्तपत्रांचा इतिहास जुना आहे. स्वातंत्र्य प्राप्तीसाठीचा संघर्ष आणि समाज प्रबोधनाचं काम या वृत्तपत्रांनी केलंय. या दोन्ही कामांत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली  आहे.' 

'संवाद कौमुदीपासून ते समाचार चंद्रीकापर्यंत आणि मिरात उल अखबारपासून ते गांधींच्या हरिजन आणि यंग इंडियापर्यंत सर्वच वृत्तपत्रांनी भारतीय समाज आणि राष्ट्रीय एकतेला सांभाळण्यासाठी खूप योगदान दिलं आहे' असंही त्यांनी म्हटलंय.

हा पुरस्कार प्रदान करण्याचं भाग्य मला लाभलं , हा माझा आनंद आहे.यातून इतरांना नक्कीच प्रेरणा मिळेल आणि त्यांच्याकडूनही असे प्रयत्न केले जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.