ट्रायल रूममध्ये कॅमेरे नाही, फॅब इंडियाच्या वकिलाचा युक्तीवाद

गोव्यातील फॅब इंडिया शोरुम मधील छुप्या कॅमेऱ्याप्रकरणी अटक केलेल्या चारही आरोपींना आज म्हापसा कोर्टात हजर करण्यात आलंय. 

Updated: Apr 4, 2015, 01:18 PM IST
ट्रायल रूममध्ये कॅमेरे नाही, फॅब इंडियाच्या वकिलाचा युक्तीवाद title=

पणजी: गोव्यातील फॅब इंडिया शोरुम मधील छुप्या कॅमेऱ्याप्रकरणी अटक केलेल्या चारही आरोपींना आज म्हापसा कोर्टात हजर करण्यात आलंय. शोरुमच्या चेंजिंग रुममध्ये छुपा कॅमेरा लावल्या प्रकरणी परेश भगत , प्रशांत नाईक , राजू पायनांशी आणि करीम लाखांनी या चार कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आलीये. 

दरम्यान शोरूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असून ट्रायल रुममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचा युक्तीवाद फॅब इंडियाच्या वकिलांनी केलाय. याप्रकरणी फॅब इंडियाचे सीइओ शुभ्रतो दत्ता आणि व्यवस्थापकीय संचालक खेरा यांनाही चौकशीसाठी बोलावणार असल्याचं कळतंय. 

गोवा फॅब इंडियाच्या व्यवस्थापक चित्राली सावंत या फरार असून त्यांच्या तपासासाठी पोलिसांच्या दोन टीम मुंबई आणि दिल्लीत रवाना झाल्यात. कर्नाटकातील तायको कंपनीकडून हे सीसीटीव्ही बसवण्यात आल्यानं त्यांच्या अधिकाऱ्यांनाही तपासासाठी समन्स बजावण्यात आलेत.  

विशेष म्हणजे केंद्रीय मनुष्यबळमंत्री स्मृती इराणी या फॅब इंडियाच्या शोरूममध्ये खरेदीसाठी गेल्या असता त्यांच्या सतर्कतेमुळंच त्यांना चेंजिंग रूममध्ये हा छुपा कॅमेरा आढळून आला होता.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.