पंपोरमध्ये दहशतवादी भारतीय आर्मीमध्ये चकमक

पंपोरमध्ये दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये अद्यापही चकमक सुरुच आहे. श्रीनगरजवळ पंपोर इथं एका शासकीय इमारतीमध्ये अतिरेकी धुसले. दहशतवाद्यांना हुडकून काढण्यासाठी लष्करानं मोठं ऑपरेशन हाती घेतलं आहे.

Updated: Oct 11, 2016, 04:21 PM IST
पंपोरमध्ये दहशतवादी भारतीय आर्मीमध्ये चकमक title=

जम्मू काश्मीर : पंपोरमध्ये दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये अद्यापही चकमक सुरुच आहे. श्रीनगरजवळ पंपोर इथं एका शासकीय इमारतीमध्ये अतिरेकी धुसले. दहशतवाद्यांना हुडकून काढण्यासाठी लष्करानं मोठं ऑपरेशन हाती घेतलं आहे.

 अद्याप अतिरेकी आणि जवानांमध्ये चकमकी सुरू आहेत. आंत्रप्रिन्युअरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूटची ही इमारत आहे. दोन ते तीन अतिरेकी इमारतीत लपून बसल्याची माहिती आहे. 

चकमकीमध्ये एक जवान जखमी झालाय. अतिरेक्यांनी इमारतीच्या काही भागात आगी लावल्यात. या इमारतीमध्ये आठ महिन्यात झालेला हा दुसरा हल्ला आहे. 

दरम्यान, काश्मीर खोऱ्यात जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनांचे सुमारे आडीचशे दहशतवादी लष्कर आणि पोलिसांवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे.