भाजपला सुनावणाऱ्या शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचं दिल्लीत डिपॉझिट जप्त

दिल्ली निवडणूक निकालानंतर भाजप-शिवसेनादरम्यान शाब्दिक द्वंद्व सुरू झालंय. मोदींचा पराभव असल्याचं म्हणणाऱ्या शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचं दिल्लीत डिपॉझिट जप्त झालंय. 

Updated: Feb 10, 2015, 11:14 PM IST
भाजपला सुनावणाऱ्या शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचं दिल्लीत डिपॉझिट जप्त title=

नवी दिल्ली : दिल्ली निवडणूक निकालानंतर भाजप-शिवसेनादरम्यान शाब्दिक द्वंद्व सुरू झालंय. मोदींचा पराभव असल्याचं म्हणणाऱ्या शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचं दिल्लीत डिपॉझिट जप्त झालंय. 

मोठा गाजावाजा करत शिवसेनेनं दिल्लीत आपले उमेदवार उभे केले होते. त्यांच्या प्रचारासाठी राज्यातून फौजही गेली होती. औरंगाबादचे शिवसेना खासदार आणि दिल्लीचे शिवसेना प्रभारी चंद्रकांत खैरे, अनिल देसाई, राहुल शेवाळे यांनी दिल्लीत प्रचारासाठी काही दिवसांचा मुक्कामही ठोकला होता. 

शिवसेनेनं १९ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. या सर्व १९ उमेदवारांचे मिळून शिवसेनेला ५२७३ मतं मिळाली. एक-दुसरा उमेदवार सोडला तर सेनेच्या कोणत्याही उमेदवाराला १ हजार मतांचा टप्पा ओलांडता आला नाही आणि सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालंय. 
 
त्यामुळे राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्याच्या प्रयत्न असलेल्या शिवसेनेला दिल्लीतील निकाल नक्कीच धक्कादायक आहे.
 
शिवसेनेते ते १९ उमेदवार आणि मिळालेली मतं पाहा-      
धरमपाल सिंह     - 497
अर्चना यादव    - 98
विजय सिंह  - 158
नवीन तिवारी    - 129
अशोककुमार शर्मा - 76
बलजीत कौर - 152
परमजीतसिंह सैनी - 49
अनिल सिंह -    118
रजिंदर कुमार    - 173
किशोर कुमार     - 48
राजू  - 330
ब्रिजमोहन - 478
छावी प्रकाश गुप्ता - 294
राजौरी गार्डन - 1706
रोहतास नगर - 65
मनमोहन - 257
गुरदयाल सिंह    - 549
छत्तरसिह   - 68
संदीप कंसल  -  28

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.