बेळगाव मारहाणप्रकरणी सेनेचे खासदार राजनाथसिंहांना भेटले

सीमाप्रश्नी मराठी भाषिकांवर कर्नाटक पोलीसांनी केलेल्या अन्यायाविरोधात आज शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळाने गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी भेट घेतली. या भेटीत कर्नाटक पोलिसांवर कारवाई करावी. तसंच हा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असेपर्यंत हा प्रदेश केंद्रशासित करावा अशी मागणी या शिष्टमंडळानं गृहमंत्र्यांकडे केली. 

Updated: Jul 30, 2014, 09:41 PM IST
बेळगाव मारहाणप्रकरणी सेनेचे खासदार राजनाथसिंहांना भेटले title=

नवी दिल्ली : सीमाप्रश्नी मराठी भाषिकांवर कर्नाटक पोलीसांनी केलेल्या अन्यायाविरोधात आज शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळाने गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी भेट घेतली. या भेटीत कर्नाटक पोलिसांवर कारवाई करावी. तसंच हा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असेपर्यंत हा प्रदेश केंद्रशासित करावा अशी मागणी या शिष्टमंडळानं गृहमंत्र्यांकडे केली. 

सीमाभागातल्या मराठी बांधवांवर सुरु असलेल्या कानडी अत्याचारावरुन आज लोकसभेत गदारोळ झाला. सीमाभाग केंद्रशासित करावा अशी मागणी शिवसेना खासदारांनी केली. कर्नाटक पोलिसांच्या अत्याचाराबाबत यावेळी शिवसेना खासदारांनी घोषणाबाजीही केली. 

महाराष्ट्र सरकारकडून निषेध ठराव
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील येळ्ळूरच्या मराठी भाषक गावक-यांना कर्नाटक पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीबद्दल महाराष्ट्र सरकारनं तीव्र निषेध केलाय. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निषेधाचा ठराव मंजूर करण्यात 

हल्ला निंदनीय - मुख्यमंत्री
सनदशीर मार्गानं आंदोलन करणा-या मराठी भाषकांवर कर्नाटक पोलिसांनी जो हल्ला केला, तो निंदनीय आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. दरम्यान, कोल्हापूरच्या पालकमंत्र्यांसह आणखी दोन मंत्री सीमाभागात जाऊन मराठी भाषकांची विचारपूस करणार आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.