शीला दीक्षित यांच्या जावयाला घरगुती हिंसाचार प्रकरणी अटक

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या जावयाला घरगुती हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलीय. 

Updated: Nov 13, 2016, 04:53 PM IST
शीला दीक्षित यांच्या जावयाला घरगुती हिंसाचार प्रकरणी अटक  title=

नवी दिल्ली : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या जावयाला घरगुती हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलीय. 

शीला दीक्षित यांची मुलगी लतिका हिनं तिचा पती सईद मोहम्मद इमरान याच्यावर घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केलीय. त्यानंतर पोलिसांनी इमरानला अटक केलीय. 
 

Sheila Dixit (centre) with daughter Latika
शीला दीक्षित त्यांच्या मुलीसोबत

दोन दिवसांपूर्वी बंगळुरूहून पोलिसांनी इमरानला ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याला ट्रान्झिट रिमांडवर दिल्लीला आणलं गेलं. 

इमरान आणि लतिका गेल्या दहा महिन्यांपासून एकमेकांपासून वेगळे राहात आहेत. काही दिवसांपूर्वी बाराखंबा पोलीस स्टेशनमध्ये लतिकानं आपल्या पतीविरुद्ध हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती.