'शत्रुघ्न सिन्हा हे 'नेता' नसून 'अभिनेता'

भारतीय जनता पक्षाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांना घरचा आहेर मिळाला आहे. कारण शत्रुघ्न सिन्हा हे 'नेता' नसून 'अभिनेता' असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे मध्य प्रदेशचे अध्यक्ष नंदकुमार सिंह चौहान यांनी केली आहे.

Updated: Feb 6, 2015, 10:20 PM IST
'शत्रुघ्न सिन्हा हे 'नेता' नसून 'अभिनेता' title=

सागर : भारतीय जनता पक्षाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांना घरचा आहेर मिळाला आहे. कारण शत्रुघ्न सिन्हा हे 'नेता' नसून 'अभिनेता' असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे मध्य प्रदेशचे अध्यक्ष नंदकुमार सिंह चौहान यांनी केली आहे.

सिन्हा यांनी भाजपवर गुरुवारी आम आदमी पक्षाचे कौतुक केले होते. याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना चौहान सिंह म्हणाले की, 'रिल मधील हिरो हा कधीच रिअल हिरो नसतो. 

सिन्हा यांना डायलॉग मारणे हे नित्याचेच आहे' भाजपच्या बैठकीसाठी आलेल्या चौहान यांनी यावेळी भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तविली आहे. दरम्यान गुरुवार शत्रुघ्न सिन्हा यांनी नवी दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाची शक्ती दिसून येत असल्याचे वक्तव्य केले होते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.