मुंबई : केंद्रात मोदींच्या नेतृत्वात एनडीए सरकारला तीन वर्ष पूर्ण झाले आहेत. मोदी सरकार उद्या चौथ्या वर्षात पदार्पण करत आहे. मोदी सरकारच्या सर्व महत्त्वाच्या दिवसांमध्ये भारतीय शेअर बाजारात दरवर्षी एक नवा उच्चांक पाहायला मिळतो. 25 मे 2017 ला सरकारचा कार्यकाळ पूर्ण झाला. शेयर बाजारवर प्रमुख सेंसेस्टिव इंडेक्स सेंसेक्स 450 अंकांनी वाढतांना दिसलं तर या रेकॉर्डसह 30,750 अंकावर शेअर मार्केट बंद झालं.
भारतीय शेअर बाजारात हे पहिल्यांदा घडलं असं नाही तर मोदी सरकारच्या प्रत्येक महत्त्वाच्या निर्णय आणि दिवसांना शेअर बाजारात काही तरी बदल पाहायला मिळतो. 25 मे 2016 ला प्रमुख सेंसेस्टिव इंडेक्स सेंसेक्स 25,305 अकांवर बंद झालसं होतं तेव्हा देखील 580 अंकांची वाढ पाहायला मिळाली होती.
25 मे 2015 ला सेंसेक्स 27,614 अंकावर बंद झालं होतं. तेव्हा ही ३० अकांची वाढ झाली होती. 27,643 अंकावर शेअर बाजार बंद झालं होतं.
25 मे 2014 ला केंद्रात मोदी सरकार आलं होतं. 26 मे 2014ला मोदींचा शपथ विधी झाला होता तेव्हा देखील सेंसेक्सने 22 मे 2014 ला 24,374 अकांवर पोहोचलं होतं. तेव्हा देखील 319 अंकांची वाढ पाहायला मिळाली होती. अशा प्रकारे सतत ३ वर्ष मोदींच्या वर्षपूर्तीनुसार शेअर बाजारात बदल पाहायला मिळतो.