'यावेळेला राखीही पाठवली नाही आणि आता भाऊही कधी परत येणार नाही'

जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारताचे तीन जवान शहीद झालेत. 

Updated: Nov 23, 2016, 03:37 PM IST
'यावेळेला राखीही पाठवली नाही आणि आता भाऊही कधी परत येणार नाही' title=

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारताचे तीन जवान शहीद झालेत. 

त्यानंतर प्रभूसिंग यांच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली. भारताच्या शहीद जवानांच्या मृतदेहाची विटंबना करण्याची ही दुसरी वेळ आहे. पाकिस्तानच्या या कुरापतीला भारताकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिलं जातयं. 

या घटनेनंतर शहीद कुटुंबीयांच्या घरांवर दुखा:चा मोठा डोंगर कोसळलाय. उत्तर प्रदेशातील गाजीपुर येथील मनोज कुमार हे या हल्ल्यात शहीद झालेत. पत्नी, आई, बहिणींला अजूनही मनोज आपल्यात नाहीये यावर विश्वास बसत नाहीये. त्यांच्या पत्नी तर मनोज यांच्या शहीद होण्याची बातमी ऐकूनच बेशुद्ध पडल्या. त्यांना लहान मुले आहे. मात्र त्या लहानग्यांना काय घडलेय याची सुतराम कल्पना नाहीये. 

काल सकाळीच मनोज यांनी आपल्या आईशी बातचीत केली होती. पुढील महिन्यात तो मोठया सुट्टीवर येणार होते. मनोज यांची लाडकी बहीणीलाही मोठा धक्का बसलाय. यावर्षी मी भावाला राखी पाठवली नव्हती आणि आता माझा भाऊ कधीही परत येणार नाहीये, अशा शब्दात त्यांनी आपले दु:ख व्यक्त केले.