पोलिसांचा प्रताप, युगुलाचा सेक्स व्हिडिओ केला अपलोड

एका प्रेमयुगुलाच्या प्रणयाचा व्हिडिओ इंटरनेटवर इंडिया रिझर्व बटालियनच्या पोलिसांनीच अपलोड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jul 4, 2013, 09:39 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, इंफाळ
एका प्रेमयुगुलाच्या प्रणयाचा व्हिडिओ इंटरनेटवर इंडिया रिझर्व बटालियनच्या पोलिसांनीच अपलोड केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
मणिपूरमधील चुराचंदपूर जिल्ह्यातील खुगा बांधजवळ प्रेमयुगल प्रणयक्रीडेत मग्न असताना पोलिसांनी त्यांना पकडले होते. प्रेमयुगुलाला अटक करून पोलिस थांबले नाहीत, तर प्रेमयुगुलाला दमदाटी करून पुन्हा प्रणयक्रीडा करण्यास भाग पाडले. पोलिसांनी ते व्हिडिओ रेकॉर्ड करून इंटरनेट अपलोड केले. आयआरबीच्या पोलिसांनी यापूर्वीही परिसरातील महिलांची छेड काढली होती.
या प्रकरणी चार पोलिस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. कोर्टाने त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, घटना घडलेला खुगा बांध परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषीत करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळतात परिसरातील नागरिक मोठ्या संख्येन रस्त्यावर उतरले होते. तसेच त्यांनी चुराचंदपूर पोलिस ठाण्यावरही मोर्चा नेला होता. पोलिसांनी त्यांच्यावर केलेल्या लाठीमारमध्ये 20 जण जखमी झाले आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.