धावत्या कारमध्ये सेक्स करताना तरुणाचा अपघाती मृत्यू

धावत्या कारमध्ये सेक्स करताना झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झालाय तर तरुणी गंभीर जखमी झालीये. 

Updated: Feb 24, 2016, 12:58 PM IST
धावत्या कारमध्ये सेक्स करताना तरुणाचा अपघाती मृत्यू title=

पिलभित : धावत्या कारमध्ये सेक्स करताना झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झालाय तर तरुणी गंभीर जखमी झालीये. 

पिलभित-पुराणपूर महामार्गावर सोमवारी रात्री ही घटना घडली. रात्रीच्या वेळेस या मार्गावरुन भरधाव वेगाने जाणाऱ्या या कारमध्ये हे जोडपे सेक्स करत होते. यावेळी त्या तरुणाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी ट्रकला जाऊन आदळली. 

हा अपघात इतका भीषण होता की त्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर तरुणी गंभीर जखमी झालीये. दरम्यान, याप्रकरणी गजरौला पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच ट्रकच्या ड्रायव्हरविरोधातही तक्रार दाखल करण्यात आलीये.