श्रीनगर : काश्मीर खोऱ्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला हिंसाचार हळूहळू निवळतोय. आज जवळपास आठवडाभरानं बाजारपेठा उघडल्यायत.
बुधवारी दगडफेकीच्या किरकोळ घटना वगळता मोठा हिंसाचार झाला नसल्याचं पोलिसांनी सांगितलंय. काही भागातली संचारबंदी शिथिल करण्यात आलीय, मात्र पांपोर आणि कुपवाडा शहरांमध्ये संचारबंदी कायम आहे. काही भागात जमावबंदी वगळता अन्य नियंत्रण हटवण्यात आलंय.
राज्यात गेल्या ४ दिवसांत झालेल्या हिंसाचारात एका पोलीस अधिकाऱ्यासह ३४ जणांचा बळी गेलाय.
दरम्यान, यावरून जोरदार राजकारणही रंगलंय. केंद्र सरकारनं स्थितीचा आढावा घेत अधिक कुमक रवाना केलीय. तसंच फुटिरतावादी हुर्रीयत कॉन्फरन्सच्या जहाल गटाचे नेते सय्यद अली शाह गिलानी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.