नवी दिल्ली : कारगील युद्धामध्ये शहीद झालेल्या कॅप्टन मनदीप सिंग यांच्या मुलीची भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनं खिल्ली उडवली आहे. पाकिस्ताननं माझ्या वडिलांचा बळी घेतला नाही तर युद्धानं घेतला असं मनदीप सिंग यांची मुलगी गुरमेहर कौर म्हणाली होती. त्यावरून सेहवागनं हे प्रत्युत्तर दिलं आहे. मी दोन त्रिशतकं केली नाहीत तर माझ्या बॅटनं केली, असं पोस्टर हातात असलेलं ट्विट सेहवागनं केलं आहे.
Bat me hai Dum !#BharatJaisiJagahNahi pic.twitter.com/BNaO1LBHLH
— Virender Sehwag (@virendersehwag) February 26, 2017
याआधी दिल्ली युनिव्हर्सिटीच्या रामजस कॉलेजमधल्या वादाबाबत गुरमेहरनं भाष्य केलं होतं. गुरमेहर कौरने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विरोधात पोस्ट लिहिली होती. गुरमेहर एबीवीपीच्या विरोधात 'टायरनी ऑफ फियर'च्या नावाने फेसबूक कँपेन देखील चालवत आहे. जी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रामजस कॉलेजमध्ये सेमिनारमध्ये जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी उमर खालिद यांना वक्ता म्हणून बोलवल्याने एबीवीपीच्या विद्यार्थ्यांनी विरोध केला. विरोधाला हिंसक वळण लागल्यानंतर जवळपास २० विद्यार्थी जखमी झाले.
या घटनेच्या विरोधात लेडी श्रीराम कॉलेजची विद्यार्थी गुरमेहरने तिची फेसबूक प्रोफाईल फोटो बदलला. या फोटोमध्ये लिहिलं आहे की, 'मी दिल्ली यूनिवर्सिटीची विद्यार्थी आहे. मी एबीवीपीला घाबरत नाही. मी एकटी नाही आहे. देशातील प्रत्येक विद्यार्थी माझा सोबत आहे.