व्हाट्सअॅप, फेसबूकसाठी तिने केली आत्महत्या

व्हाट्सअॅप आणि फेसबूकचा सातत्याने वापर करणाऱ्या पत्नीला पतीने ओरडा भरला. पती रागवल्याने ही नवविवाहिता खूप दु:खी झाली. तिने कौनदमपालयम परिसरातील आपल्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली.

Updated: Oct 14, 2015, 12:06 PM IST
व्हाट्सअॅप, फेसबूकसाठी तिने केली आत्महत्या title=

कोयंबतूर : व्हाट्सअॅप आणि फेसबूकचा सातत्याने वापर करणाऱ्या पत्नीला पतीने ओरडा भरला. पती रागवल्याने ही नवविवाहिता खूप दु:खी झाली. तिने कौनदमपालयम परिसरातील आपल्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली.

पोलिसांनी सांगितले, ट्रक ड्रायव्हर पती कुमार नेहमी कामानिमित्ताने बाहेर गावी फिरत असे. त्यामुळे केरळ येथे घरी एकटी राहणारी त्याची पत्नी अपर्णा (२०) नेहमी सोशल मीडियावर व्यस्त राहायची. ती व्हाट्सअॅप आणि फेसबूकचा वापर करीत होती. ती नेहमी मोबाईलवर असल्याने पतीने तिला ओरडा भरला आणि मोबाईल काढून घेतला.

ही बाब अपर्णाने दुसऱ्या फोनवरून आपल्या मोठ्या भावाला माहिती दिली. त्यानंतर तिने आपली खोली बंद केली. मात्र, घरच्यांनी खोली उघडण्याचे आवाहन केले. ती खोली उघडत नसल्याचे पाहून पतीने दरवाजा तोडून प्रवेश केला. त्यावेळी पत्नी छता लटकल्याचे पाहताच त्याच्या पायाखालची वाळू सरकली. अपर्णाला दवाखाण्यात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान, पत्नीने आत्महत्या केल्याने दु:खी झालेला कुमारनेही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नातेवाईकांनी त्याला रोखले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.