संसदेत खासदारांची धक्काबुक्की - हाणामारी

सरकारी नोकरीमध्ये आरक्षणाच्या जोरावर पदोन्नती मिळावी या विधेयकाने राज्यसभेत चांगलच गोंधळ केला. राज्यसभेत खासदारांनी धक्काबुक्की, हाणामारी केली.

Updated: Sep 5, 2012, 01:42 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
सरकारी नोकरीमध्ये आरक्षणाच्या जोरावर पदोन्नती मिळावी या विधेयकाने राज्यसभेत चांगलच गोंधळ केला. राज्यसभेत खासदारांनी धक्काबुक्की, हाणामारी केली. सरकारने राज्‍यसभेत हे विधेयक मांडल्‍यानंतर सभागृहात चांगला गोंधळ झाला. त्‍यानंतर दुपारी दोन वाजेपर्यंत राज्‍यसभेचे कामकाज स्‍थगित करण्‍यात आले. लोकसभेतही गदारोळ झाला. त्‍यामुळे सभागृहाचे कामकाज दोन वेळा स्‍थगित करावे लागले.
संसदीय कामकाज राज्‍यमंत्री व्‍ही. के. नारायणसामी यांनी पदोन्‍नतीमध्‍ये आरक्षण विधेयक राज्‍यसभेत मांडले. या विधेयकावरुन समाजवादी पार्टी आणि बहुजन समाजवादी पार्टीच्‍या सदस्‍यांमध्‍ये जोरदार चकमक उडाली. त्‍यांच्‍यामध्‍ये धक्‍कबुक्‍कीही झाली.
सपा खासदार नरेश अग्रवाल यांनी विधेकाला विरोध केला आणि ते वेलकडे जाण्‍यास निघाले. बसपा खासदारांनी त्‍यांना अडविले. बसपचे सदस्‍य अवतार सिंह आणि अग्रवाल यांच्‍यात त्‍यावेळी धक्‍काबुक्‍की झाली