'उपराष्ट्रपतींनी तिरंग्याला सलामी न देणं प्रोटोकॉलनुसारच...'

राजपथावर प्रजासत्ताक दिवसाच्या सोहळ्यादरम्यान राष्ट्रगीत सुरू असताना उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी राष्ट्रध्वाजाला सलामी दिली नाही. हा विषय सोशल मीडियामध्ये भलताच गाजला. यानंतर घाईघाईने उपराष्ट्रपतींच्या कार्यालयानं यावर एक स्पष्टीकरण जाहीर केलंय. 

Updated: Jan 27, 2015, 07:42 PM IST
'उपराष्ट्रपतींनी तिरंग्याला सलामी न देणं प्रोटोकॉलनुसारच...' title=

नवी दिल्ली : राजपथावर प्रजासत्ताक दिवसाच्या सोहळ्यादरम्यान राष्ट्रगीत सुरू असताना उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी राष्ट्रध्वाजाला सलामी दिली नाही. हा विषय सोशल मीडियामध्ये भलताच गाजला. यानंतर घाईघाईने उपराष्ट्रपतींच्या कार्यालयानं यावर एक स्पष्टीकरण जाहीर केलंय. 

संयुक्त सचिव आणि उपराष्ट्रपती के. ओएसडी गुरदीप सप्पल यांच्या म्हणण्यानुसार, प्रजासत्ताक दिनाला परेडच्या दरम्यान भारताचे राष्ट्रपती सर्वोच्च कमांडरच्या नात्यानं राष्ट्रध्वजाला सलामी देतात. प्रोटोकॉलनुसार यावेळी, उपराष्ट्रपतींना सावधानच्या स्थितीत उभं राहणं आवश्यक नसतं. 
  
सप्पल यांच्या म्हणण्यानुसार, उपराष्ट्रपती मुख्य व्यक्ती असतील तर ते राष्ट्रगीतादरम्यान पगडी घालून सलामी देतात... जसं यावर्षी एनसीसी शिबिरात घडलं होतं. 

प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यानंतर लगेचच राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर हे तिरंग्याला सलामी देतानाच अन्सारी मात्र सावधान स्थितीत उभे असल्याचा फोटो सोशल वेबसाईटवर व्हायरल झाला होता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.