हैदराबाद : वेश्याव्यवसाय चालविल्याप्रकरणी एका शिक्षिकेसह शिक्षकाला अटक करण्यात आली आहे, हैदराबाद शहरातील चैतन्युपीर परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४७ वर्षीय बोक्का सुरेंदर रेड्डी आणि ३८ वर्षीय रायावाराओ विशाला वेरोनिका अशी अटक केलेल्या शिक्षकांची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींकडून पाच मोबाईलही ताब्यात घेतले आहेत.
‘दोन शिक्षक वेश्याव्यवसाय चालवत असल्याची माहिती हाती आली होती. छाप्यावेळी एका युवतीला ताब्यात घेण्यात आले, त्याचा वैद्यकीय अहवाल अद्याप हाती आलेला नाही. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे,‘ असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.