गुगलचा उपक्रम | ग्रामीण महिलांना इंटरनेटशी जोडण्याचे प्रयत्न

आजच्या दिवसभरातील एक अत्यंत चांगली बातमी. देशातील ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांना इंटरनेटशी जोडण्यासाठी गुगलने एक खास उपक्रम हाती घेतला आहे. 

Updated: Dec 16, 2015, 08:59 PM IST
गुगलचा उपक्रम | ग्रामीण महिलांना इंटरनेटशी जोडण्याचे प्रयत्न title=

मुंबई : आजच्या दिवसभरातील एक अत्यंत चांगली बातमी. देशातील ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांना इंटरनेटशी जोडण्यासाठी गुगलने एक खास उपक्रम हाती घेतला आहे. 
(व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली)
पुढच्या तीन वर्षात भारतातील ३ लाख गावातील महिलांना ऑन लाईन मदत दिली जाणार असल्याचे, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगितलं. 

पिचाई यांनी गुगलचा पदभार सांभाळल्यानंतर ते प्रथमच भारतात आले आहेत, यावेळी त्यांनी या मोहिमेची घोषणा केली. गुगलच्या या उपक्रमामुळे देशाच्या ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलण्यास मदत होणार आहे. तसेच ग्रामीण भागातील महिलांना आरोग्य, शिक्षण आणि सन्मान मिळणार आहे. महिलांना स्वत:चे निर्णय घेता येणार आहे.