पंतप्रधान मोदींविरुद्ध भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न - ऑर्गनायझर

साहित्य अकादमीचे पुरस्कार परत करून देशात मोदींविषयी भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इंग्रजी साप्हिकातून करण्यात आलाय. ऑर्गनायझर या मासिकाच्या संपादकियातून साहित्यिकांनी घेतलेली भूमिका चूकीचं असल्याचं म्हटलयं.

Updated: Oct 21, 2015, 05:22 PM IST
पंतप्रधान मोदींविरुद्ध भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न - ऑर्गनायझर title=

नवी दिल्ली: साहित्य अकादमीचे पुरस्कार परत करून देशात मोदींविषयी भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इंग्रजी साप्हिकातून करण्यात आलाय. ऑर्गनायझर या मासिकाच्या संपादकियातून साहित्यिकांनी घेतलेली भूमिका चूकीचं असल्याचं म्हटलयं.

आणखी वाचा - गोहत्या करणाऱ्याचा वध करणं पाप नाही - पांचजन्य

भारतात विचारसरणीच्या माध्यमातून डावे आणि त्यांना पाठिंबा देणारा मीडिया नेहमीच हिंदूत्वाच्या विचाराचा विरोध करत आले आहेत. नक्षल चळवळीला स्वतःच्या विचारधारेपासून वेगळं ठरवून डावे पुरोगामित्वाचा झेंडा खांद्यावर घेतात आणि शिवसेना, श्रीराम सेना यासारख्या संघटनांवर निशाणा साधतात. त्याचाच एक भाग म्हणून सध्या साहित्यिकांनी मोदीं सरकारविरोधात मोहिम उघडल्याचा आरोप ऑर्गनायझरमधून करण्यात आलाय. 

आणखी वाचा - हिंदूत्ववादी संघटना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात

डाव्या आणि पुरोगामी संघटना भारताच्या जनमानसात त्यांची जागा हरवून बसल्या आहेत. आणि ती जागा परत मिळवण्यासाठीच सगळा आटापिटा होत असल्याचंही ऑर्गनायझरनं म्हटलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.