`६०० रुपयांचं रेशन ५ जणांच्या कुटुंबासाठी महिनाभरासाठी पुरेसं!`

६०० रुपयांमध्ये पाचजणांच्या कुटुंबाचं आरामात पोट भरू शकतं, असा दावा दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी केला आहे. दिल्लीमधील यूपीए-२ सरकारच्या कॅश फॉर फूड योजनेच्या उद्घाटन प्रसंगी शीला दीक्षित यांनी हे वक्तव्य केलं आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 16, 2012, 05:36 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
६०० रुपयांमध्ये पाचजणांच्या कुटुंबाचं आरामात पोट भरू शकतं, असा दावा दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी केला आहे. दिल्लीमधील यूपीए-२ सरकारच्या कॅश फॉर फूड योजनेच्या उद्घाटन प्रसंगी शीला दीक्षित यांनी हे वक्तव्य केलं आहे.

शीला दीक्षित म्हणाल्या, की हे अनुदान पाच जणांच्या गरीब कुटुंबासाठी पुरेसं आहे. एवढ्या किमतीत डाळ, भात, पोळ्या सहज उपलब्ध होऊ शकतात. ज्यावेळी या भाषणात शीला दीक्षित यांनी आपलं हे मत मांडलं, त्यावेळी तेथे युपीए आणि काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधीही उपलब्ध होत्या.
शीला दीक्षित यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी चांगलीच टीका केली आहे. या भाषणानंतर जेव्हा शीला दीक्षित स्टेडिअममधून बाहेर आल्या, तेव्हा एका महिलेने त्यांना अडवून आपला राग व्यक्त केला. ‘५ ते ७ जणांच्या कुटुंबाला महिन्याभरासाठी १००० ते ३००० रुपयांचं रेशन लागतं, हे तुम्हाला माहित नाही का?’ असा सवाल या महिलेने शीलाजींना केला.