नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा जावई रॉबर्ट वाड्राने प्रियंका गांधींबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. राजकारणात येणार असल्याच्या प्रश्नावर उत्तर देतांना वाड्रा यांनी हे वक्तव्य केलंय.
वाड्रा बोलले की, माझा जीवन सुधरण्यासाठी किंवा जीवनात पुढे जाण्यासाठी मला प्रियंका गांधींची गरज नाही. माझ्या आई-वडिलांनी अगोदरपासूनच खूप धनसंपत्ती दिली आहे. त्यामुळे मला पुढे जाण्यासाठी प्रियंकांची गरज नाही.
वाड्रा पुढे म्हणतात की, नरेंद्र मोदी सरकारला लवकरच मोठ्या विरोधाचा सामना करावा लागणार आहे. देशातील जनता समजदार आहे. त्यांना बरोबर-वाईट कळतं. डीएलएफ जमीन वादात फसलेल्या वाड्रांनी म्हटलं की, लोकांच्या बोलण्यावरून मी देश सोडणारा नाही आहे.
'रिअल इस्टेट सहित प्रत्येक बिझनेस क्षेत्रातील लोकं निराश आहेत. लवकरच लोकांच्या रागाचा उद्रेक होणार आहे.' असं देखील वाड्रांनी म्हटलंय. मागच्या वर्षी देखील एका फेसबूक पोस्टवरुन वाड्रा वादात सापडले होते.