VIDEO: लालूंची डबस्मॅशवर एंट्री, पंतप्रधान मोदींच्या मिमिक्रीचा व्हिडिओ वायरल

राष्ट्रीय जनता दलचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी डबस्मॅशवर एंट्री केलीय. सुरूवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मिमिक्रीचा व्हिडिओ त्यांनी टाकलाय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झालाय.

Updated: Oct 6, 2015, 10:45 AM IST
VIDEO: लालूंची डबस्मॅशवर एंट्री, पंतप्रधान मोदींच्या मिमिक्रीचा व्हिडिओ वायरल title=

मुंबई: राष्ट्रीय जनता दलचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी डबस्मॅशवर एंट्री केलीय. सुरूवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मिमिक्रीचा व्हिडिओ त्यांनी टाकलाय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झालाय.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणूकीपूर्वी 'अच्छे दिन'बाबत केलेल्या वक्तव्याची यात मिमिक्री करण्यात आलीय. बिहार विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असतांना लालूंचं हे एक टेक्नोसॅव्ही पाऊल म्हटलं जातंय.

राजदच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आलेल्या १७ सेकंदाच्या व्हिडिओमध्ये लालूंचा हा अनोखा अंदाज पाहायला मिळतो. 'क्या हुआ तेरा वादा ,वो कसम वो इरादा, वादे है वादों का क्या, चुनाव जीत गए उसके बाद तू कौन और तेरा क्या," या मॅसेजसह हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे.

पाहा व्हिडिओ  -

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.