निवडणुकीत प्रचारात धर्माचा वापर; यावर आज सुनावणी

जवळपास दोन दशकांपूर्वीच्या निवडणूकीच्या प्रचारात धर्माचा वापर करण्यासंदर्भातल्या एका निर्णयाचा पुर्नविचार करण्यासंदर्भात केलेल्या अत्यंत महत्वाच्या याचिकेवर आज सर्वाच्च न्यायालयात पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. 

Updated: Oct 19, 2016, 09:07 AM IST
निवडणुकीत प्रचारात धर्माचा वापर; यावर आज सुनावणी title=

नवी दिल्ली : जवळपास दोन दशकांपूर्वीच्या निवडणूकीच्या प्रचारात धर्माचा वापर करण्यासंदर्भातल्या एका निर्णयाचा पुर्नविचार करण्यासंदर्भात केलेल्या अत्यंत महत्वाच्या याचिकेवर आज सर्वाच्च न्यायालयात पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. 

मंगळवारी मुख्य न्यायमूर्ती टी एस ठाकूर यांच्या नेतृत्वातल्या सात न्यायमूर्तींच्या खंडपीठानं यासंदर्भात काही महत्वाचे सवाल उपस्थित केले होते.  

एखाद्या धर्मगुरूनं देवाच्या किंवा धर्माच्या नावानं कुठल्याही उमेदवाराला पाठिंबा दिला, तर हे वर्तन 1951च्या लोकप्रतिनिधी कायद्याचं उल्लंघन आहे का? असा सवाल उपस्थित करण्यात आला होता.  त्यावर सरकारी वकीलांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. पण कोर्टानं याचिका कर्त्यांनाच या प्रश्नांच उत्तर देण्यास सांगितलंय.