रेखा, जया, राखी संसदेत; सचिनची रजा

खासदार सचिन तेंडुलकर, खासदार रेखा यांच्या संसदेतील उपस्थितीवरुन जोरदार टीका झाल्यानंतर रेखा या आज संसदेत उपस्थित राहिल्या. मात्र, सचिन तेंडुलकर यांने रजा टाकली. दरम्यान, अभिनेत्री राखी सावंत आणि माजी खासदार जया बच्चन याही संसदेच्या गॅलरीत उपस्थित होत्या.

Updated: Aug 12, 2014, 08:10 PM IST
रेखा, जया, राखी संसदेत; सचिनची रजा title=

नवी दिल्ली : खासदार सचिन तेंडुलकर, खासदार रेखा यांच्या संसदेतील उपस्थितीवरुन जोरदार टीका झाल्यानंतर रेखा या आज संसदेत उपस्थित राहिल्या. मात्र, सचिन तेंडुलकर यांने रजा टाकली. दरम्यान, अभिनेत्री राखी सावंत आणि माजी खासदार जया बच्चन याही संसदेच्या गॅलरीत उपस्थित होत्या.

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आणि प्रेस काऊन्सिलचे अध्यक्ष मार्कण्डेय काटजू यांनी सचिन तेंडुलकरला ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यावर टीका केलीय. एव्हढचं नव्हे तर सचिन आणि रेखाला खासदार बनवणं म्हणजे देशाचा अपमान करणं होय, असं काटजू यांनी म्हटलंय. 

 सचिन आणि रेखाच्या राज्यसभेतल्या कमी उपस्थितीवरून गोंधळ उडाला. सचिन सलग चाळीस दिवस अनुपस्थित आहे आणि नियमानुसार, सलग साठ दिवस दांडी असेल तर खासदारकीच रद्द होते. संसदेच्या रेकॉर्डसनुसार सचिन यावर्षभरात एकदाही संसदेत आलेला नाही. तसंच 2013 मध्येही सचिननं केवळ 3 दिवस सत्रात भाग घेतला होता. पुढील वीस दिवसांच्या कामकाजात रेखा आणि सचिन हे दोघे सहभागी न झाल्यास त्यांची खासदारकी रद्द होऊ शकते. मात्र, सचिनने रजेचा अर्ज केला. 

मोठा भाऊ अजित याची बायपास सर्जरी झाल्यामुळे त्याच्यासोबत राहणं आवश्यक होतं.त्यामुळेच आपण राज्यसभेमध्ये हजर राहिलो नाही... राज्यसभा किंवा अन्य कुठल्याही आस्थापनेचा अपमान करण्याचा आपला हेतू नाही’ असं स्पष्टिकरण सचिननं दिलंय. 

यावेळी, माझ्या गैरहजेरीवर गरजेपेक्षा जास्तच चर्चा होत असल्याचंही सचिननं म्हटलंय. याबद्दल त्यानं व्यक्त केलेली नाराजी स्पष्ट होती. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.