आमिर खानचा पंतप्रधानांना सल्ला

भारत हा सहिष्णू देश आहे, पण काही जणं द्वेष पसरवत आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सगळ्यावर लगाम घालावा, असं वक्तव्य बॉलिवूड अभिनेता आमिर खाननं केलं आहे. 

Updated: Mar 5, 2016, 08:40 PM IST
आमिर खानचा पंतप्रधानांना सल्ला title=

मुंबई:  भारत हा सहिष्णू देश आहे, पण काही जणं द्वेष पसरवत आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सगळ्यावर लगाम घालावा, असं वक्तव्य बॉलिवूड अभिनेता आमिर खाननं केलं आहे. तसंच मी 'अत्युल भारत'चा ब्रँड ऍम्बेसेडर नसलो तरीही मी भारताचा ब्रँड ऍम्बेसेडर आहे, असंही आमिर म्हणाला आहे. 

तोडण्याची भाषा करणारे सगळ्याच जाती धर्मांमध्ये आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना रोखावं असं आमिर म्हणाला आहे. इंडिया टीव्हीच्या आप की अदालत या शोमध्ये त्यानं हे वक्तव्य केलं आहे. 

तसंच असहिष्णूतेबाबत मी केलेल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला, असंही आमिर म्हणाला आहे. काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारांमुळे मला आजही दु:ख होतं, काश्मिरी पंडितांचं पुन्हा तिथे पुनर्वसन करावं अशी विनंती मी काश्मिरच्या जनतेला करतो, अशी प्रतिक्रिया आमिरनं दिली आहे.