यंदाचा उन्हाळा गोड जाणार, साखरेच्या किमतीत मोठी घसरण

अवकाळी पावसामुळं अक्षरश: हाताशी आलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. त्याचा परिणाम असा झाला की, गहू, डाळी तसंच आंब्याच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. पण त्यात एक दिलासा देणारीही बातमी सामान्य जनतेसाठी आहे.

Updated: Apr 5, 2015, 03:38 PM IST
यंदाचा उन्हाळा गोड जाणार, साखरेच्या किमतीत मोठी घसरण title=

मुंबई : अवकाळी पावसामुळं अक्षरश: हाताशी आलेल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. त्याचा परिणाम असा झाला की, गहू, डाळी तसंच आंब्याच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. पण त्यात एक दिलासा देणारीही बातमी सामान्य जनतेसाठी आहे.

साखर आणि बटाट्याच्या किंमतींमध्ये सात वर्षातील सर्वात मोठी घसरण झाल्याचं समजतंय. देश-परदेशात झालेल्या चांगल्या उत्पादनामुळं ह्या किंमती घसरल्यात. 

गेल्या वर्षी घाऊक बाजारात  ३३०० रुपये प्रती क्विंटल हा साखरेचा भाव होता तो यंदा २५५० ते २५८० असा आहे. तर बटाट्याच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाल्यानं त्यांच्या किंमतीही घटल्यात. त्याचबरोबर तांदुळ, तेल, कापसाच्या किंमतीही कमी झाल्यात. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती घसरल्यानं खाद्य तेलाच्या किंमतीत ८ ते १० टक्क्यांनी घट झालीय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.