पासपोर्टवर पिता किंवा पतीचं नाव बंधनकारक नसावं म्हणून शिफारस

महिलांच्या पासपोर्ट संदर्भात  इंटर मिनिस्ट्रियल पॅनेलने एक मोठी शिफारस केली आहे. जर शिफारस लागू झाली तर पासपोर्टमध्ये पिता, आई किंवा पतीचं नाव असणं बंधणकारक असणार नाही.

Updated: Nov 6, 2016, 08:20 PM IST
पासपोर्टवर पिता किंवा पतीचं नाव बंधनकारक नसावं म्हणून शिफारस title=

नवी दिल्ली : महिलांच्या पासपोर्ट संदर्भात  इंटर मिनिस्ट्रियल पॅनेलने एक मोठी शिफारस केली आहे. जर शिफारस लागू झाली तर पासपोर्टमध्ये पिता, आई किंवा पतीचं नाव असणं बंधणकारक असणार नाही.

परराष्ट्र मंत्रालयाला पाठवला रिपोर्ट

परराष्ट्र मंत्रालयाला पाठवलेल्या एका रिपोर्टमध्ये असं म्हटलं गेलं आहे की, पिता, माता किंवा पतीचं नाव न छापण्याची पद्धत वैश्विक स्तरावर मान्य व्हावी. यासाठी मंत्रालयाला या सगळ्या माहितीमध्ये वेळ घालवावा लागणार नाही. पॅनेलचं म्हणणं आहे की, इमिग्रेशन दरम्यान याचा कोणताही वापर नसतो. अधिकतर देशांमध्ये पासपोर्टवर छापण्यासाठी वडील, आई किंवा पतीचं नाव नाही विचारलं जात.

पॅनेलचं म्हणतं की ही माहिती गरजेची असू शकते पण ती पासपोर्टवर छापली गेली पाहिजे असं नाही. महिलांना यामुळे अधिक तक्रारी संभवतात. लग्नाआधी जर पासपोर्ट काढला असेल तर लग्नानंतर त्याच्या नावात बदल करावा लागतो. महिलेचा जर घटस्फोट झाला तर पुन्हा तिला नाव बदलावं लागतं. अशा काही तक्रारी समोर ठेवण्यात आल्या आहेत.

महिला व बाल कल्‍याण मंत्री मेनका गांधी यांनी पररष्ट्रमंत्री सुषमा स्‍वराज यांना पत्र लिहून सिंगल पँरेंट प्रियंका गुप्‍ता यांच्याबाबत उल्लेख केला होता. प्रियंका यांच्या मुलीला पासपोर्ट देण्यात मनाई करण्यात आली कारण अधिकारिऱ्यांना तिच्या पित्याचं नाव हवं होतं. पण प्रियंका यांना मुलीच्या जन्मानंतर जमत नसल्याने ते वेगळ्या राहत होत्या. त्यामुळे मुलीच्या पासपोर्टवर पित्याचं नाव देण्यास त्यांना मान्य नव्हतं. दिल्ली हायकोर्टाने देखील यावर पित्याचं नाव देण्याच गरजेचं नसल्याचं म्हटलं होतं.