मुंबई: रिझर्व्ह बँकेने द्वैमासिक पतधोरण जाहीर केलं असून व्याजदरांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रेपो रेट ८ टक्के आणि रिव्हर्स रेपो रेट ७ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे.
मात्र अर्थव्यवस्था सध्या आश्वासक पातळीवर असल्याचं सांगत त्यांनी पुढल्या वर्षाच्या सुरूवातीला नव्यानं आढावा घेण्यात येईल आणि स्थिती चांगली राहिल्यास व्याजदरांमध्ये आवश्यक बदल केले जातील, असं सांगत रघुराम राजन यांनी आश्वस्तही केलं.
कच्च्या तेलाचे घसरलेले दर, त्यामुळे सावरलेला रुपया आणि कमी झालेला महागाई निर्देशांक यामुळं आर्थिक आघाडीवर सध्या आनंदाचं वातावरण आहे. व्याजदर कमी करायला ही स्थिती पोषक असली, तरी राजन यांनी सावधं पावलं टाकल्याचं दिसतंय.
केंद्र सरकारच्या दबावानंतरही रिझर्व्ह बँकेनं व्याज दर कमी करण्यास नकार दिला आहे. धनाच्या किमतीमुळं आणि सोन्याच्या आयातीत झालेल्या कमतरतेच्या पार्श्वभूमीवर वित्तीय तूट आटोक्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर आणि अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी व्याजदर कपात होणार का याकडे सरकार, उद्योग आणि शेअर बाजाराचे लक्ष लागलं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.