रिझर्व्ह बँकेकडून लवकरच खुशखबर मिळण्याची शक्यता

येत्या 2 जून रोजी रिझर्व्ह बँक आपली चलनविषयक धोरण अर्थात मॉनिटरी पॉलिसी जाहीर करणार आहे. परंतु, यापूर्वीच व्याज दरांमध्ये कपात झाल्याची खुशखबर मिळू शकते.

Updated: May 7, 2015, 04:09 PM IST
रिझर्व्ह बँकेकडून लवकरच खुशखबर मिळण्याची शक्यता title=

मुंबई : येत्या 2 जून रोजी रिझर्व्ह बँक आपली चलनविषयक धोरण अर्थात मॉनिटरी पॉलिसी जाहीर करणार आहे. परंतु, यापूर्वीच व्याज दरांमध्ये कपात झाल्याची खुशखबर मिळू शकते.

भारताची शिखर बँक आपल्या व्याज दरांत कपात करू शकते. याचं कारण म्हणजे, स्टेट बँक ऑफ इंडियानं गुरुवारी रिसर्च नोट जाहीर केलीय. यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपल्या व्याज दरांत 25 बेसिस पॉईंटसची कपात करू शकते, अशी शक्यता व्यक्त करण्यात आलीय. त्यामुळे व्याज दर कमी होण्याची शक्यता निर्माण झालीय. 

12 मे रोजी कस्टमर प्राईज इंडेक्स (सीपीआय) डाटा जाहीर होणार आहे आणि यानंतर व्याजदर कपातीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

यापूर्वी एप्रिल महिन्यात आरबीआयनं आपल्या चलनविषयक धोरणाची समीक्षा केली होती. यावेळी शिखर बँकेकडून व्याज दरांत कोणतेही बदल करण्यात आले नव्हते. त्यामुळ, लोकांच्या ईएमआय मद्ये कोणतीही वाढ झाली नव्हती, हे विशेष. आरबीआयनं सीआरआर, रेपो आणि रव्हर्स रेपो रेटमध्ये कोणताही बदल केला नव्हता. त्यामुळे, जून महिन्यात आरबीआय या दरांत काय बदल करणार याकडे अनेकांचं लक्ष लागून आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.