भिकाऱ्यांनी सुरू केली स्वत:ची बॅंक, कर्ज वाटप सुरू!

ही बातमी वाचल्यानंतर भिकाऱ्यांना भिकारी बोलावं का?, हा प्रश्न तुमच्या समोर पडेल. बिहारच्या गया शहरातील भिकाऱ्यांच्या एका समुहाने चक्क स्वत:ची एक बॅंक सुरु केली आहे, जी ते स्वत: चालवता.

Updated: May 7, 2015, 02:44 PM IST
भिकाऱ्यांनी सुरू केली स्वत:ची बॅंक, कर्ज वाटप सुरू! title=

पाटणा : ही बातमी वाचल्यानंतर भिकाऱ्यांना भिकारी बोलावं का?, हा प्रश्न तुमच्या समोर पडेल. बिहारच्या गया शहरातील भिकाऱ्यांच्या एका समुहाने चक्क स्वत:ची एक बॅंक सुरु केली आहे, जी ते स्वत: चालवता.

संकटसमयी त्यांना वित्तीय सहाय्य मिळेल, हा बॅंक सुरू करण्यामागचा त्यांचा हेतू आहे.

गया शहरातील 'मां मंगळागौरी' मंदिरात येणाऱ्या श्रद्धाळूंच्या कृपेने या भिकाऱ्यांनी ही आपली बॅंक सुरू केली आहे. भिकाऱ्यांनी या बॅंकेंचे नाव 'मंगला बॅंक' ठेवले आहे.

या बॅंकेत ४०  सदस्य आहेत. त्यापैकी एक राज कुमार मांझीने सांगितले की, 'हे खरं आहे की आम्ही बॅंक स्थापन केली आहे. बॅंकेचा व्यवस्थापक, खजिनदार, सचिव, एजेंट आणि बॅंक चालवणारे अन्य सर्व सदस्य भिकारी आहेत.'

मांझी याने सांगितले की, 'आम्ही सर्वजण बॅंकेत दर मंगळवारी २०  रुपये जमा करतो. त्यानुसार दर आठवड्याला ८००  रुपये जमा होतात.'

बॅंकेत खाती उघडण्यासाठी आता जास्तीत जास्त लोकांशी संपर्क साधला जात आहे. या भिकाऱ्यांकडे ना बीपीएल कार्ड आहे, ना आधार कार्ड आहे. त्यामुळे संकटसमयी या भिकाऱ्यांच्या मदतीसाठी त्यांनी स्वत:च आपला मार्ग शोधून काढला आहे.

या बॅंकेतून कर्ज घेण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या कागदपत्राची पूर्तता करावी लागत नाही किंवा कोणताही जामिनदाराची गरज नाही.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.