खिशात पैसे नसतानाही व्यवहार शक्य, आरबीआयकडून नव्या प्रणालीला मंजुरी

आता एकही रुपया जवळ न बाळगता सर्व व्यवहार करता येणं शक्य होणार आहे. त्यासाठीची नवी प्रणाली नुकतीच सुरू करण्यात आली आहे. या नव्या डिजीटल बँकिंगमुळं प्रवास, बाजारहाट, बीलं भरणं, मोबाईल रिचार्ज अशी सर्व कामं करता येणं शक्य होणार आहे. 

Updated: Aug 26, 2016, 12:57 PM IST
खिशात पैसे नसतानाही व्यवहार शक्य, आरबीआयकडून नव्या प्रणालीला मंजुरी title=

नवी दिल्ली : आता एकही रुपया जवळ न बाळगता सर्व व्यवहार करता येणं शक्य होणार आहे. त्यासाठीची नवी प्रणाली नुकतीच सुरू करण्यात आली आहे. या नव्या डिजीटल बँकिंगमुळं प्रवास, बाजारहाट, बीलं भरणं, मोबाईल रिचार्ज अशी सर्व कामं करता येणं शक्य होणार आहे. 

रिझर्व्ह बँकेनं देशातल्या 21 बँकांना नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एनपीपीसीआयच्या माध्यमातून युनीफाईड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच युपीआयच्या कार्यान्वयाला मंजुरी दिली आहे. या 21 बँकांमध्ये सहकार क्षेत्रातील ठाणे जनता सहकारी बँक या एकमेव सहकारी बँकेचा समावेश आहे. या सुविधेसाठीचं ऍप लवकरच गूगल प्लेवर उपलब्ध होणार आहे.